परिवहन विभागाच्या सारथी प्रणाली बाबत वापरकर्त्यांना सूचना

परिवहन विभागाच्या सारथी प्रणाली बाबत वापरकर्त्यांना सूचना

गडचिरोली, दि.05:गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनता तसेच वाहन मालक चालक यांना सुचित करण्यात येते की, परिवहन विभागाच्या सारथी या प्रणालीमधील काही टेबल खराब झालेले आहेत तसेच काही सेवा सुरु नाहीत त्यामुळे प्रणालीची भार सहन करण्याची क्षमता आणखी मर्यादित झालेली आहे. या समस्येचे निराकरण करण्याकरिता सर्व टिम रात्रदिवस काम करीत आहेत. मात्र डीबीचा आकार मोठा असल्याने वेळ लागत आहे. हा गंभीर क्षण आहे. त्यामुळे गेल्या दोन- तिन दिवसांपासून सारथी प्रणाली वापरकर्त्यांची गैरसोय होत आहे. हे काम पून: दोन दिवस चालण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील सर्व जनता तसेच वाहन/ मालक चालक यांनी या उपरोक्त बाब लक्षात घेऊन परिवहन विभागाला सहकार्य करण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली यांनी केले आहे.