चंद्रपूर : अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अखिल भारतीय नागरी सेवा क्रीडा स्पर्धेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

चंद्रपूर दि. 26 जुलै :  केंद्रीय क्रीडा नियंत्रक मंडळ, नवी दिल्ली यांच्यावतीने विविध खेळ प्रकारातील “अखिल भारतीय नागरी सेवा स्पर्धा” राज्य शासनाच्या वतीने त्या-त्या राज्यांमध्ये आयोजित केल्या जातात. या स्पर्धेसाठी विविध खेळ प्रकारातील महाराष्ट्र शासनाचा संघ निवड चाचणी घेऊन स्पर्धेसाठी पाठवायचे आहेत.

राज्य शासनाकडून सचिवालय जिमखान्यास या स्पर्धेसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध खेळ प्रकारातील संघ निवडण्याची व त्यांच्या प्रशिक्षण शिबिराची जबाबदारी सोपविली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या खेळाडू व कर्मचाऱ्यांना टेबल टेनिस, बॅडमिंटन, फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बास्केट बॉल, ब्रीज, कॅरम, बुद्धिबळ ,अॅथलेटिक्स, लघुनाट्य, कबड्डी, वेटलिफ्टिंग, पावर लिफ्टिंग, शरीरसौष्ठव, कुस्ती, लॉन टेनिस, नृत्य व संगीत या खेळ प्रकारात ज्यांना भाग घ्यावयाचा असेल, त्यांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथून प्राप्त करून संबंधित कार्यालय प्रमुख किंवा विभाग प्रमुख यांच्या मान्यतेने दोन प्रतीमध्ये पाठवावेत.

अशी आवेदनपत्रे व्यवस्थापक, सचिवालय जिमखाना, मुंबई 400032 ज्यांच्याकडे दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत टपालाद्वारे किंवा व्यक्तिशः तसेच sachivalayagym@rediffmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावे. तसेच सदर अर्जाची एक प्रत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे.