जिल्हा सामान्य रुग्णालयातील ए .आर. टी केंद्राला  :- जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील ए .आर. टी केंद्राला

 :- जिल्हाधिकाऱ्यांची भेट व पाहणी

 

           भंडारा, दि.९ : जिल्हा सामान्य रुग्णालयातील एआरटी केंद्राला जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपचंद सोयाम,जिल्हा सामान्य रुग्णालय,अतिरिक्त जिल्हाचिकित्सक डॉ. टेंभुरणे,हे उपस्थित होते.  जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये नेत्र तपासणी कक्षामध्ये रुग्णसंख्या दिवसेदिवस वाढत असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी व कार्यालयीन  नर्स व इतर कर्मचारी वाढवण्याची  गरज असल्याचे जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांचे निदर्शनास आले. त्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिली.

       त्यानंतर ए.आर.टी.केंद्र,  त्यांनी भेट दिली असून तेथील काम अ चांगले व सुव्यवस्थितरित्या सुरु असून याबाबत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.या केंद्रामध्ये  कार्यरत वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ.हिरलाल निरगुळकर व इतर कर्मचारी उपस्थित होते. ए.आर.टी.केंद्र,2009 पासून कार्यान्वित असून या केंद्रामध्ये आजपर्यत एकुण 4818  रुग्णांनी   उपचार करून घेतले.

        लाभार्थी नियमित  ए.आर.टी. औषधोपचार व सेवा-सुविधा घेत आहेत.या नोंदणीकृत लाभार्थ्यांची नियमित 6 महिन्यांनी सिडी-4 व व्हायरल लोड तपासणी केली जात असून व्हायरल लोड सप्रेशन 95 टक्के असल्याची माहिती शल्यचिकीत्सक डॉ.सोयाम यांनी दिली. संशयित क्षयरोग लाभार्थ्यांची नियमित तपासणी करण्यात येवून संदर्भ सेवा देण्यात येतात,तसेच गरजू लाभार्थ्यांना अशासकीय संस्था यांचे सहकार्याने सामाजिक योजनाचा लाभ मिळणेकरिता मदत करण्यात येत असते.लाभार्थ्यांचे सोयीसाठी पाठपुरावा व्यस्थितरित्या  घेण्याकरिता मागील 1 वर्षापासून ई-सुश्रृत व टोकन पध्दतीने ए.आर.टी.केंद्रामध्ये काम सुरु आहे.

           तसेच लाभार्थ्यांचे उत्तम आरोग्यासाठी व समुपदेशन प्रभावीपणे करण्यासाठी 4 समूपदेशकामधे सम प्रमाणात लाभार्थ्यांचे पालकत्व स्विकारण्यात आले असल्याची माहिती डॉ. सोयाम यांनी दिली.