लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजीने वेधले नागरिकांचे लक्ष / मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाला महासंस्कृती महोत्सवात प्रतिसाद

लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजीने वेधले नागरिकांचे लक्ष / मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकाला महासंस्कृती महोत्सवात प्रतिसाद

भंडारा दि. 1 : सांस्कृतीक कार्य विभाग व जिल्हा प्रशासन, तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या समन्वयातून महासंस्कृती महोत्सव अंतर्गत मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिकाचे सादरीकरण खेळांडूनी केले.त्यात लाठीकाठी, दांडपट्टा, तलवारबाजी या मैदानी खेळांचा समावेश होता.

 मंगळवार 30 जानेवारी,2024रोजी सकाळी दहा वाजतापासून गांधीचौक – शिवाजी चौक शुक्रवारी – पोस्टऑफीसचौक –त्रिमुर्ती चौक- या मुख्य मार्गावर प्रस्तुती करण्यात आली .या प्रात्यक्षीकांना पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. जिल्हा क्रीडा संकुलात या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी,श्रीमती लिना फलके, जिल्हा नियोजन अधिकारी श.क.बोरकर, प्रामुख्याने उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी  लिना फलके, यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित मान्यवरांचे हस्ते प्रात्यक्षिक प्रस्तुत करणाऱ्या खेळाडू/विद्यार्थ्यांचे तसेच आर.के.स्पोर्टस अकॅडमी, प्रशिक्षक श्री.राकेश कोडापे,व शउपासराव सोनवाने यांचे सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आलेला आहे.. लतिका लेकुरवाडे क्रीडा अधिकारी, यांनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक प्रस्तृत करणाऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

            स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राजेंद्र सावरबांधे, सुरज लेंडे, सुधीर गळमळे,.रामभाऊ धुडसे, अतुल गजभिये यांनी विशेष परिश्रम घेतले.