जिल्हा उदयोग पुरस्कारासाठी 12  फेब्रुवारीपर्यत अर्ज करावे – उदयोग विभागाचे आवाहन

जिल्हा उदयोग पुरस्कारासाठी 12  फेब्रुवारीपर्यत अर्ज करावे उदयोग विभागाचे आवाहन

भंडारा दि. 1 : उदयोग चालविण्यासाठी जिद्द व चिकाटी निर्माण व्हावी व त्यासाठी शासकीय पातळीवर कौतुक व्हावे व उद्योजकांचा उत्साह व्दिगुणीत व्हावा यासाठी राज्य नामार्फत यशस्वी उद्योजकांना जिल्हा पुरस्काराने गौरविण्यात येते. यासाठी न्यातील ०१/०१/२०१९ पुर्वी स्थायी नोंदणी (एम एस एम ई- पार्ट-11 मेमोरंडम / नोंदणी स्विकृत केलेले) झालेले व सतत २ वर्षे उत्पादन करीता असलेले घटक जे देणा-या वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नाहीत अशा लघु उद्योग घटकाची निवड  करण्यात येते. प्रथम पुरस्कार रु. १५०००/- रोख व व्दितीय पुरस्कार रु. १००००/- सेच शाल, श्रीफळ व गौरव चिन्ह देवुन सत्कार करण्यात येतो.

भंडारा जिल्हयातील लघु उद्योजकांना कळविण्यात येते की, त्यांनी सन २०२३ पुरस्कारासाठी जिल्हा पुरस्कार योजनेअंतर्गत भाग घ्यावा. योजनेअंतर्गत अर्ज करण्याची अंतीम तारीख १२ फेब्रुवारी २०२४ ही आहे. त्यानंतर अर्ज स्विकारले नाहीत. अर्जासोबत (१) एम एस एम ई- पार्ट-11 मेमोरंडम / उद्यम नोंदनी केल्याच्या एक्नॉलेजमेंटची संपूर्ण प्रत (२) मागील ३ वर्षात ताळेबंद (Balance च (३) बँकेचे / वित्तीय संस्थांचे थकबाकीदार नसल्याचे (कर्ज घेतले असल्यास) – अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. अर्जाच्या नमुन्यासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र, भंडारा, प्रशासकीय ईमारत, तळमजला, राष्ट्रीय क. ६ येथे संपर्क साधावा.  कार्यालयाचा दुरध्वनी क्र. ०७१८४-२५१५८२ वर देखील संपर्क करता येईल.