जि.प. प्राथमिक शाळा एकारा इथे “एकारा महोत्सव” संपन्न

जि.प. प्राथमिक शाळा एकारा इथे “एकारा महोत्सव” संपन्न

प्रतिनिधी :- वैभव मेश्राम एकारा, ब्रम्हपुरी 

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ब्रम्हपुरी तालुक्यातील एकारा या गावात जि. प. प्राथ. शाळेच्या व गावकऱ्यांच्या पुढाकारातून एकारा या गावात 2 दिवसीय एकारा महोत्सव पार पडला. जि. प.शाळेचे मुख्यध्यापक श्री दिलीप बावनकर सर, श्री धकाते सर, श्री घोडमारे सर, आणि चुऱ्हे मॅडम यांनी या एकारा महोत्सवाचे आयोजन केले.त्यांना गावातील ग्राम पंचायत मधून खूप मोठी मदत मिळाली, 2 दिवसीय एकारा महोत्सवात शाळेतील विद्यार्थ्यांची आणि गावातील महिलांची मैदानी खेळ तसेच रा त्रो ला सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले.2 दिवस अपुरे पडतात म्हणून पुढल्या वर्षी पासून 3 दिवसीय एकारा महोत्सव घेऊ अशी ग्वाही शाळेचे मुख्याध्यापक श्री बावनकर सर यांनी दिली, गावकऱ्यांनी सर्व शिक्षक वृंद यांचे आभार मानले.