जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बुक, पेन व गणवेश वितरण ; ​​​​​​​पार्थ सोशल फाउंडेशनचा पुढाकार

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बुक, पेन व गणवेश वितरण ; ​​​​​​​पार्थ सोशल फाउंडेशनचा पुढाकार

सिंदेवाही: पार्थ सोशल फाउंडेशन सिंदेवाही येथील संस्थेच्या माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना बुक व पेनचे वाटप करण्यात आले. शेतमजुरांच्या मुलांना पार्थ सोशल फाउंडेशन च्या संस्थापिका सौं आशा बन्सोड यांचा मुलगा पार्थ बन्सोड यांचा वाढिवसानिमित्त त्यांच्या कडून गरजु व गोरगरीब विद्यार्थ्यांना वाटप गणवेश चे वाटप करण्यात आले.

आजही समाजातील अनेक घटक मूलभूत सुविधांपासून वंचीत आहेत. अशा या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्यातून शैक्षणिक मदत करणाऱ्या सौं आशा बन्सोड यांचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. गोरगरीब व होतकरू मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. पार्थ सोशल फाऊडेशन च्या संचालिका यांनी सौ. आशा बन्सोड यांनी त्यांच्या घरप्रपंचात काटकसर करून जमा करण्यात आलेल्या रक्कमेतून सामाजिक बांधिलकीतून गोरगरीब व अनाथ मुलांना गणवेश देण्यास दिलेले योगदान उल्लेखनीय असून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक मदत करत असतात. अशा प्रकारचे व्यक्तव्य जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चे मुख्याध्यापाक जांभूळकर सर यांनी केले.

25 जानेवारी या दिवशी मुलाचा वाढदिवस असल्यामुळे पार्थ सोशल फांडेशन च्या संस्थापिका सौ आशा बनसोड यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडला व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरकेपर या ठिकाणी जाऊन विद्यार्थ्याना बुक व पेन देण्यात आले व गरजु विद्यार्थ्याना गणवेश चे वितरण करण्यात आले. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जांभूळकर सर, बोरकर सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, गावातील नागरीक व विदयार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.