अखेर लाभधारक शेतकऱ्यांना मिळाला न्याय !

अखेर लाभधारक शेतकऱ्यांना मिळाला न्याय !

सिंदेवाही – सिंदेवाही तालुक्यातील मौजा वानेरी येथील शासकीय भूमापन क्रमांक -११६ माराजी ०.७०हे.आर . बोडीच्या पोटातील जागेत गेल्या पाच सहा वर्षापासून गावातील सात ग्रामस्थांनी अतिक्रमण करून शासकीय जागा बळकावण्याचा प्रयत्न केला याबाबत बॉडीच्या पाण्याचे लाभधारक श्री विठ्ठल डोनुजी कामडी व इतर 12 शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला व आज दि. 25/01/2024 रोजी अनधिकृत बांधकाम हटवून शासनाने शासनाची जागा ताब्यात घेतली त्यावेळेस प्रशासना तर्फेप्रशासनातर्फे सर्वच जबाबदार विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपापले कायदेशीर जबाबदारी पार पाडली व शेतकऱ्यांना होणाऱ्या त्रासातून कायमचे मुक्त केले. ही कारवाई जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता भुसारी, तोगट्टीवार , म्हसेकर , नायब तहसीलदार तुमराम , पोलीस विभागाचे पीएसआय महले व इतर सहकारी, मंडळ अधिकारी तोडसाम तलाठी ग्रामसेवक ग्रामपंचायतचे सरपंच व हक्कदार शेतकरी उपस्थित होते.