23 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार

23 जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार

भंडारा दि. 21 :  01/01/24 या अर्हता दिनांकावर आधारीत भंडारा जिल्हयातील 60-तुमसर, 61-भंडारा व 62-साकोली विधानसभा मतदार संघाच्या अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी दि.23/01/24 रोजी करण्यात येणार आहे. महा.शासनाने दि.22/01/24 रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली असल्याने अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 22/01/24 ऐवजी  23/01/24 रोजी करण्यात येणार आहे

            सदर अंतिम मतदार यादी जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर, तहसिल कार्यालय, उपविभागीय कार्यालय, येथे तसेच मा.मुख्य निवडणूक अधिकारी महा. राज्य यांचे वेबसाईटवर (https://ceo.maharashtra.gov.in/) व जिल्हाधिकारी कार्यालयाचे वेब साईटवर (https:bhandara.gov.in) पाहण्यास उपलब्ध आहे. तसेच अद्यापदेखील ज्या मतदारांनी मतदार नोंदणी केली नाही, त्यांनी आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निरंतर पुनरिक्षण कालावधीत मतदार नोंदणी करावी असे आवाहन  योगेश कुंभेजकर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, भंडारा यांनी केले.