शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता हरकती व सूचना आमंत्रित

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता हरकती व सूचना आमंत्रित

           भंडारा, दि.6: क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यासाठी राज्य शासन “शिवछत्रपती राज्य् क्रीडा जिवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्कार (खेळाडू) ”, “शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम)”,“शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.

          शासन निर्णय क्र.शिछपु.2023/प्र.क्र.188/क्रीयुसे-2,दि.29 डिसेंबर,2023 रोजीच्या शासन निर्णया नुसार नियम क्र.1.19, नियम क्र.1.20 नियम क्र.1.21 अन्वये संचालनालयाच्या http://sportsmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पुरस्कार टॅब मध्ये(इग्रजीकरीता-Awards) शिवछत्रपती राज्य् क्रीडा पुरस्काराकरीता प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे प्राथमिक छाननी केलेला गुणांकन तक्ता एकुण गुणांकनासह नमूद कालावधीमध्ये  दि.06 ते 08 फेब्रुवारी, 2024 रोजी रात्री 12.00 वाजेपर्यंत सूचना व हरकती सादर करावयाच्या आहेत.

           त्यानुसार सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात सूचना व हरकती सादर करावे, असे क्रीडा विभागामार्फत आवाहन करण्यात येत आहे. विहीत नमूना http://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन, डाऊनलोड करुन घ्यावा.