मतदार दिनानिमित्त जिल्हा स्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित

मतदार दिनानिमित्त जिल्हा स्तरीय रांगोळी स्पर्धा आयोजित

भंडारा दि. 21 : मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत  जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा व जिल्हा निवडणूक अधिकारी भंडारा यांच्या वतीने 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधून भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये तिन गट विभागून देण्यात आलेले आहेत. पहिला गट हा वय १५ ते १८, दुसरा गट हा वय १९ ते २५ आणि तिसरा गट हा वय २५ ते वर असा राहिल. रांगोळी स्पर्धेचा विषय हा “मतदार जनजागृती व मतदानाची टक्केवारी वाढविणे” हा राहील.

३ उत्कृष्ट विजेत्यांना स्मृतीचिन्ह व प्रमाण पत्र जिल्हाधिकारी साहेब यांचे हस्ते देण्यात येईल. स्पर्धेची वेळ सकाळी- 9.00 पासून दि. 25 जाने 2024 – स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा. स्पर्धकांनी आपले साहीत्य सोबत आणावे. स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी गुगल फार्म भरून 24 जाने 2024 पर्यत https://forms.gle/eiSJAF9YFo1kFtd1A या लिंकवर भरावे अन्यथा सपर्धेमधे सहभागी होता येणार नाही.