सिंदेवाहीत होणार श्रीरामाचे जयघोषाचा गजर
मंदिरात दिव्यांची आरास , विद्युत रोषणाई : शोभायात्रेत बाहुबली हनुमानचे नृत्य आकर्षण.
शहरातील श्री राम मंदिर येथे अयोध्या येथील २२ जानेवारीला होणारा कार्यक्रम सोमवार सकाळी 11 वाजता श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या स्थळी असलेली 32 देवी देवतांचे व 5 संतांचे मूर्ती असलेल्या मंदिरातून श्री राम नामाचा जयघोष केला जाणार आहे. मंदिरात दिव्यांची आरास करून विद्युत रोषणाई केली जाणार आहे. 5 दिवसांचे विविध कार्यक्रम सोबतच सोमवारला संध्याकाळी प्रमुख मार्गाने शोभायात्रा मध्ये बाहुबली हनुमान चे नृत्य आकर्षण राहणार आहे. श्री राम मंदिर उत्सव समिती चे वतीने आयोजन केलेले आहे.
तालुक्यातील परिसरात सिंदेवाही शहरात एकमेव 32 देवी- देवतांचे व 5 संतांचे मूर्ती ,नक्षीकाम केलेले गरुडस्तंभ असलेले श्री राम मंदिर देवस्थान मध्यभागी आहे. अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा हा सोहळा ऐतिहासिक साजरा करण्यासाठी रामभक्त सज्ज झाले आहेत. कार्यक्रमानुसार सकाळपासूनच श्री रामनामाच्या गजराला सुरुवात होणार आहे. दिव्यांची आरास करून मंदिर परिसरात रोषणाई केली जाणार आहे. मंदिर परिसरात भक्तांकरिता सोमवरला सकाळी 11 वाजता श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे कार्यक्रम श्री राम मंदिरस्थळी मोठी एलसिडी स्क्रीन द्वारे लाईव्ह प्रक्षेपण सुविधा होणार आहे. श्री राम मंदिरात आरती, प्रसादाचे वाटप केले जाणार आहे.
– श्री राम मंदिरापासून शहरातील प्रमुख मार्गाने रांगोळी सजावट केलेली राहणार असून संध्याकाळी भक्तीमय वातावरणात शोभायात्रा निघणार आहे. शहरातील शोभायात्रा मध्ये दिंडी, रथावर विराजमान श्रीराम, लक्ष्मण, सीता यांची मूर्ती , सर्वांचे आकर्षण मध्यप्रदेशतील प्रसिद्ध बाहुबली हनुमान सोबतिला चार वानरसेना डीजे चे तालवर नृत्य राहणार आहे.
शहरातील मंदिर देवस्थान सुनीलभाई दोषी यांचे नेतृत्वात आहे. मंदिरातील गाभाऱ्यात श्रीराम, लक्ष्मण, सीता अशा तीन संगमरवरी दगडांचे आकर्षक मूर्ती आहेत. शहराचे वॉर्डातील मंदिर स्वच्छ्ता , घरासमोरील रांगोळी तसेच दिवे लावणार आहे. मंदिर परिसरात महिलांचे भजन, कीर्तन, वेशभूषा स्पर्धा, पारितोषिक कार्यक्रम स्थळी केले जाणार आहेत.
सर्व गावकरी मंडळी, गणेश मंडळ, दुर्गा मंडळ, शारदा मंडळ, महिला मंडळ,शहर परिसरातील महिला,युवक,युवती ,विद्यार्थी प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी बंधू,ज्येष्ठ नागरिकांचा, तसेच सर्व रामभक्तांचा वेशभूषा परिधान करून सहभाग असणार आहे.
– श्री राम मंदिराचे विशेष 32 देवी देवतांचे व 5 संतांचे मूर्ती , सर्वांचे रक्षण करीत साक्षात हनुमानाचे मंदिर, नक्षीकाम गरुडस्तंभ आरूढ आहे.
– श्री राम प्रतिष्ठान सोहळा निमित्त कळस यात्रा व अक्षता वाटप झालेले आहेत.
– शहरातील श्री राम मंदिर उत्सव समिती द्वारे राम भक्तांकरीता शोभायात्रेचे आकर्षण राहणार आहे.