महिलांसाठी विशेष ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

महिलांसाठी विशेष ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

भंडारा, दि. 24 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र भंडारा आणि जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने 27 जुलै 2023 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 या वेळेत ऑनलाईन पध्दतीने महिलांसाठी विशेष ऑनलाईन प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.रांजनगाव एमआयडीसी पुणे हि नामांकित कंपनी सहभागी होणार असून या माध्यमातून जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगार तसेच इच्छुक व गरजू युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
सदर मेळाव्याच्या अनूषंगाने नियोक्त्यांनी त्यांचेकडील रिक्तपदांची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवरील त्यांचे लॉगीनमधून पंडित दीनदयाल उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा भंडारा येथे त्यांचेकडील रिक्तपदे अधिसुचित करावीत. तसेच नोकरीइच्छुक युवतींनी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाईन अप्लाय करावा. Diesel Mechanic/ MMV/ Painter (G)/Electronics/Electrician/ICTSM/Wireman/SheetMetal/Welder/Tactor Mechanic/Fitter/COPA या ट्रेडमधील 18 ते 30 वयोमर्यादा असणारे महिला सहभागी होऊ शकतात. ॲप्रेटीसशिप या पदाकरीता आयटीआय पास उमेदवार असल्यास त्यांना 1
2000/- प्रतिमाह विद्यावेतन मिळेल. तात्पुरती नियुक्ती करीता आयटीआय पास उमेदवार असल्यास त्यांना 15500/- प्रतिमाह वेतन आणि बस,कँटीन इ.सुविधा मिळतील. ट्रेनी या पदाकरीता आयटीआय पास आणि 6 महिन्याचा अनूभव असल्यास त्यांना 16 हजार वेतन आणि बस, कँटीन इ.सुविधा मिळतील. सदर मेळाव्याच्या दिवशी फियाट इंडिया ऑटोमोबाईल्स प्रा.लि.रांजनगाव एमआयडीसी पुणे यांचेमार्फत ऑनलाईन मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.
सदर ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक इच्छुक व गरजू युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन श्री.सुधाकर झळके, सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,भंडारा यांनी केले आहे. याबाबत काही अडचण आल्यास कार्यालयाच्या 07184 – 252 250 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श्री.श.क.सय्यद मो.क्र.7620378924 यांचेशी संपर्क साधावा. याशिवाय, उमेदवार जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हा क्रिडा संकूल परिसर, बस स्टँडजवळ, भंडारा येथे प्रत्यक्ष संपर्क साधू शकता.