23 जानेवारी रोजी होणार अंतिम मतदारयादी प्रसिध्द

23 जानेवारी रोजी होणार अंतिम मतदारयादी प्रसिध्द

गडचिरोली, दि.20 : निवडणूक आयोगाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. सदर सुधारित कार्यक्रमानुसार मतदारयादीची अंतिम प्रसिध्दी करण्याचा दिनांक सोमवार 22 जानेवारी 2024  रोजी होता. तथापिमहाराष्ट्र शासनाच्या दि.19 जानेवारी 2024 च्या अधिसुचनेनुसार दि.22 जानेवारी  रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर केली आहे. त्याअनुषंगाने अंतिम यादी दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्दी करण्यास  मान्यता देण्याची विनंती या कार्यालयाने भारत निवडणूक आयोगास केली होती. त्यानुसार भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या अंतिम मतदार  याद्या मंगळवार दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी करण्याचे निर्देश दिले आहेत.

          सदर बदललेल्या वेळापत्रकाप्रमाणे मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी  दिनांक 23 जानेवारी 2024 रोजी करण्यात यावी असे उपसचिव व सह मुख्य निवडणुक अधिकारीमहाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.