महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांची
शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी

गडचिरोली, दि.26:गडचिरोली जिल्ह्यतील सर्व महाविद्यालयांना कळविण्यात येते की, समाजकल्याण विजाभज, इमाव व विमाप्र विभागाच्या भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शिष्यवृत्ती योजनेचे सन 2023-24 या सत्रातील महा-डिबीटी प्रणालीवर या जिल्ह्यात विद्यार्थ्यांची अर्ज अत्यल्प प्रमाणपत्र नोंदणी झालेले आहेत. करीता सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय स्तरावर प्रवेशित विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अर्ज नोंदणी लवकरात लवकर करुन घ्यावी. तसेच महाविद्यालय स्तरावर प्रलंबीत असलेले फ्रेश व रिनिवल अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण या कार्यालयास सादर करण्यात यावे.
सदर बाबत विद्यार्थ्यांना कोणतेही प्रकारचे अडचण निर्माण झाल्यास महाविद्यालयाने मार्गदर्शन करावे तसेच शिष्यवृत्तीस पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहणार याची गांर्भीयांने नोंद घ्यावी असे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, गडचिरोली यांनी कळविले आहे.