23 जानेवारी रोजी कोषागार कार्यालयाची प्रशिक्षण आयोजन 

23 जानेवारी रोजी कोषागार कार्यालयाची प्रशिक्षण आयोजन 

         भंडारा,दि.18 : जिल्हा कोषागार काया्रलय,भंडारा अंतर्गत उपकोषागार कार्यालयासह सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांचे 1 फेब्रुवारी,2024 रोजी कोषागार दिन पासून प्रायोगिक तत्तवावर दूरध्वनी,विद्युत इत्यादीचे देयके मॅनयूल कागदी स्वरुपात स्वरुपात कोषागार कार्यालयात देयके खिडकीवर स्विकारणे पूर्णत:बंद करुन फक्त इलेक्ट्रॉनिक इत्यादी स्वरुपात स्विकराणे सुरु करण्यात येत आहे.

       त्यानुषंगाने सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांच्या कार्यालयात संबंधित देयक लिपिक, लेखापाल, रोखपाल यांना कोषागार कार्यालयाकडून 23 जानेवारी,2024 रोजी  सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय,परिसर भंडारा येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

          तसेच जिल्हा कोषागार व उपकोषागार अधिनस्त सर्व कार्यालयातून प्रत्येकी 1 स्वत : आहरण व सवितरण अधिकारी तसेच देयकांशी संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचारी  यांनी वरिल ठिकाणी उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मंगला डोरले यांनी कळविले आहे.