विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरणार आक्षेप/हरकती असल्यास तसे दस्ताऐवज पुराव्यासह 30 दिवसाचे आत सादर करावे

जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट –क व गट-ड मधील
रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरणार
आक्षेप/हरकती असल्यास तसे दस्ताऐवज पुराव्यासह 30 दिवसाचे आत सादर करावे

गडचिरोली, दि.16 :जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत गट –क व गट-ड मधील रिक्त असलेले विविध संवर्गाची पदे अनुकंपाधारकामधून भरावयाच्या आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत सन 2023 मध्ये प्राप्त अनुकंपा प्रकरणाची तपासणी करुन पुर्ण व अपुर्ण प्रकरणाची माहिती असलेल्या एकूण 464 उमेदवारांची तात्पुरती जेष्ठता सुची तयार करुन जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या www.zpgadchiroli.in या संकेतस्थळावर तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सुचना फलकावर प्रकाशित करण्यात आलेली आहे. अनुकंपाधारकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, त्यांनी सदर तात्पुरती जेष्ठता सुचीचे अवलोकन करावे. व आपले आक्षेप/हरकती असल्यास तसे दस्ताऐवज पुराव्यासह 30 दिवसाचे आत या कार्यालयास सादर करावे. अन्यथा विहित मुदतीत आक्षेप/ हरकती सादर न केल्यास विचारात घेण्यात येणार नाही. व जेष्ठता सुची अंतिम करण्याची कार्यवाही करण्यात येईल. असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.), जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी कळविले आहे.