जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पाहणी ‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा घेतला आढावा

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्याकडून पाहणी ‘जाणता राजा’ महानाट्याच्या तयारीचा घेतला आढावा

          भंडारा, दि. 12 :  जिल्ह्यात प्रशासनामार्फत 17, 18, व 19 जानेवारीला जाणता राजा महानाटयाचा प्रयोग होणार असून या महानाट्यासाठीच्या तयारीला आढावा आज जिल्हाधिकारी श्री.कुंभेजकर यांनी  घेतला. खात रोडवरील रेल्वे ग्राउंड परिसरात महानाट्यासाठी स्टेज,पाणी व विद्युत तसेच पार्किंग याबाबतचा आढावा घेतला.

नगरपरिषद भंडारा यांच्यावतीने या कार्यक्रमासाठी आज मुख्याधिकारी विनोद जाधव यांनी तयारीची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली.

        जास्तीत जास्त शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांनी हे महानाट्य याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी  रेल्वे ग्राऊंडवर येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

         शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्याभिषेकापर्यंतच्या रोमांचकारी प्रसंग ‘जाणता राजा ‘ मध्ये दाखविण्यात येणार आहे. राज्याचा सांस्कृतिक विभाग, जिल्हा व नगरपालिका प्रशासनामार्फत या महानाट्याचे आयोजन करण्यात आले  आहे. यासाठी प्रवेशिका असेल, मात्र प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे. उंट,घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमाचे जिवंत चित्रण  कलाकार करणार आहेत.

        यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी लीना फलके,जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ,मुख्याधिकारी विनोद जाधव व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.