सिंदेवाहीतील मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन सोहळा प्रेक्षकांची फुल्ल गर्दी : वेशभूषा , फटाके,ढोल ताशांचा बेधुंद गजर..

सिंदेवाहीतील मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन सोहळा
प्रेक्षकांची फुल्ल गर्दी : वेशभूषा , फटाके,ढोल ताशांचा बेधुंद गजर..

सिंदेवाही : संदीप बांगडे
शहरातील मस्कऱ्या गणपतीचे स्थापना जवळपास 40 वर्षापासून सुरू आहे . मस्कऱ्या गणपती विसर्जन सोहळ्याचे प्रेक्षकांनी गर्दीने फुलून गेलेले होते. गणपती मंडळातील ढोल ताशा ,डीजे च्या आवाज, विविध वेशभूषा , नटलेल्या कलावंतांच्या झाकी बघण्यासाठी नागरिक, युवा , महिला, बेधुंद मधुर सुरात नाचण्याचा आनंद घेत विसर्जन सोहळा संपन्न झाला.शहरातील मिरवणूक पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनात गणपती विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली आहे.

शहरात वीस मस्कऱ्या गणपतीची मंडळांनी गणेश मूर्ती स्थापना केली होती. मस्कऱ्या गणपतीची चाळीस वर्षापासून परंपरा सुरू आहे. शहरातील प्रमुख मार्गाने मस्कऱ्या गणपती विसर्जन मिरवणूक निघाली होती. नेहमीप्रमाणे श्रीराम मंदिराला प्रदक्षिणा घालून गणेश मंडळाचे गणपती रांगेत लागत असतात. युवा क्रांती कल्याणकारी गणेश मंडळ, श्रीराम गणेश मंडळ ,सिद्धिविनायक गणेश मंडळ, उज्वल ज्योत गणेश मंडळ, संताजी गणेश मंडळ एसटीसीएल गणेश मंडळ ,एकता गणेश मंडळ, आझाद गणेश मंडळ, व इतर गणेश मंडळांच्या मूर्ती विसर्जनाकरिता विविध वेशभूषेत मिरवणुकीमध्ये नकलाकार, कलावंत दिसून आले. गणपती मिरवणुकीत मध्ये रंगीबिरंगी लायटिंग , फटाके अतिषबाजी, डीजे ,धुमाल च्या मधुर सुरात नाचण्याकरिता प्रेक्षक नागरिकांनी व युवा मंडळांनी गर्दी केली होती. सिद्धिविनायक गणेश मंडळाच्या वतीने विविध वेशभूषेतील बाहुबली हनुमान ,वानर सेना ,जोकर व अद्भुत प्रकारातील वेशभूषा जटाधारी आकर्षण प्रेक्षकांची गर्दी वाढवीत होती. प्रेक्षकांना महाप्रसादाचे वाटप द हेल्पिंग हॅण्ड वर्क फाउंडेशन संस्थेचे वतीने केले.
शहरातील प्रमुख मार्गाने मिरवणूक निघाल्याने विसर्जनाकरिता जाणाऱ्या प्रत्येक गणेश मंडळाला नगरपंचायत चे वतीने शाल, श्रीफळ व ट्रॉफी देण्यात आली .त्यासोबतच ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते अरुण भाऊ कोलते यांच्या स्मृती प्रित्यर्थ बिस्किट व पाणी वाटप स्वप्निल कावळे यांचे वतीने करण्यात आले.
गणपतीचे विसर्जन तलाव स्थळी करण्यात आले. त्यासोबतच पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त केल्याने वाहतुकीस कुठलाही अडथळा निर्माण झालेला नाही. शहरातील मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन सोहळा आनंदात व नागरिकांच्या गर्दीत सुरक्षित पार पडला आहे.