एआरटी केंद्र येथे सामाजिक संरक्षण शिबिर संपन्न

एआरटी केंद्र येथे सामाजिक संरक्षण शिबिर संपन्न

गडचिरोली, दि.07: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार व जिल्हा एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा रुग्णालय, गडचिरोली आणि एआरटी सेंटर सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दि.07 मार्च 2024 रोजी सामाजिक संरक्षण शिबिराचे आयोजन डॉ. नागदेवते नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एआरटी केंद्र जिल्हा सामान्य रुग्णालय, येथे पि.एल.एच.आय.व्ही रुग्णांसाठी करण्यात आले होते. या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शन म्हणून तहसिलदार, संजय पवार, यांनी संजय गांधी निराधार योजना व पुरवठा विभागाची माहिती दिली. जिल्हा ग्रामिण विकास योजनेची प्रतिनिधी एस.के.बेडके यांनी घरकुल योजनाबाबत माहिती दिली. बाल संरक्षण अधिकारी प्रियंका आसुटकर यांनी बाल सरंक्षण विभागाच्या योजनाची माहिती दिली.
डॉ. नागदेवते नोडल अधिकारी एआरटी केंद्र यांनी एचआयव्ही रुग्णांना योजनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डापकु, एआरटी, विहान कर्मचारी यांचे सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमास 55 लाभार्थी उपस्थित होते. असे जिल्हा कार्यक्रम अधिकारी, सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.