जिल्हयात कुष्ठरोगज नजागृती अभियान राबविले जाणार 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान मोहीम

जिल्हयात कुष्ठरोग नजागृती अभियान राबविले जाणार 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी दरम्यान मोहीम

            भंडारा,दि.9 : कुष्ठरोगाबाबत असलेले अज्ञान गैरसमज गोष्टी जबाबदार असून समाजात त्याबद्दल जनजागृती आवश्यक आहे.केंद्रशासनाने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2024 मोहिमचे आयोजन केले आहे. ही मोहिम भंडारा जिल्हयात 30 जानेवारीते 13 फेब्रुवारी,2024 पर्यत राबविण्यात येणार आहे. सद्या जिल्हयातील 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नुकताच याबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी याबाबत आरोग्य विभागाची बैठक घेऊन आढावा घेतला.

           कुष्ठरोगाचे प्रमाण दर 10 हजारी एक पेक्षा कमी करणे,कुष्ठरोग विकृती दर्जा 2 प्रमाणे शुन्य आणणे,समाजातील लोकमध्ये कुष्ठरोगाबाबत असलेली अंधश्रध्दा व गैरसमज दुर करणे,समाजातील प्रत्येक कुष्ठरोगाबाबतची जनजागृती ग्रामीण व शहरी भागातील तळागाळा पर्यत पोहचऊन कुष्ठरोगमुक्त भारतदेश हा संकल्प साध्य करणे हे   या स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियानाचे उद्देश आहेत.

          कुष्ठरोग हा आजार अनुवांशिक नसून तो पूर्व जन्माच्या पापाने होत नाही.तर मायकोबॅक्टेरियम लेप्रि या कुष्ठजंतूमुळे होणारा इतर लवकर निदान आणि उपचार केल्याने पूर्णत:बरा होतो.लवकर निदान आणि उपचार न घेतल्यास विकृती येऊ शकते.

          शासकीय रुग्णालयात कुष्ठरुग्णांवर मोफत उपचार व पुर्नरचनात्मक शस्त्रक्रिया केल्या जातात.व शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना बुडीत मजुरी म्हणून 8 हजार रुपये शासनाकडून मोबदला देण्यात येतो.महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी रोजी 30 जानेवारी रोजी कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे.

           या पंधरवडयात नुक्कड नाटक,रोगमुक्त कुष्ठ जिल्हयातील मनोगत, खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची कार्यशाळा आदी कार्यक्रमासोबत 26 जानेवारी,2024 ला जिल्हयातील 541 ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत प्रतिज्ञा,कुष्ठरोगविषयक संदेश देण्यात येणार आहे. कुष्ठरुगणांसोबत समाजात भेदभाव न होता सन्मानाने जगण्याकरिता समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावे व प्रत्येक कार्यक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी  केले आहे.