राज्य क्रीडा दिनाचे 15 जानेवारी  रोजी आयोजन

राज्य क्रीडा दिनाचे 15 जानेवारी  रोजी आयोजन 

भंडारा, दि.4: राज्य शासनाच्या निर्देशान्वये, महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा.पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांचे संयुक्त विद्यमाने दि.15 जानेवारी हा दिवस ऑलिंपीकवीर दिवंगत खाशाबा जाधव यांचा जन्मदिन राज्य क्रीडा दिनम्हणून साजरा करण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने दि.15 जानेवारी, 2024 रोजी विविध स्पर्धांचे आयोजनजिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, छत्रपती  शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, भंडारा येथे करण्यात येणार आहे. व दि.15 जानेवारी 2024 रोजी सकाळी 08.00 वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा मार्फत राज्य क्रीडा दिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याप्रसंगी  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांनी 10 जानेवारीपर्यंत आपला प्रवेश जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे नोंदवावा व अधिक माहिती करीता कार्यालयीन वेळेत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा येथे संपर्क साधावा. खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल बॉक्सींग व कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या  स्पर्धेत विजेत्या स्पर्धेकांना पारितोषीक देण्यात येइल. त्याकरीता स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी, भंडारा घनश्याम राठोड यांनी केलेले आहे.