महाराष्ट्र पोलीस दलाचा यांचा रेझींग डे निमीत्त PLAY With POLICE खेळाडूंना बक्षीस वितरण”

महाराष्ट्र पोलीस दलाचा यांचा रेझींग डे निमीत्त PLAY With POLICE खेळाडूंना बक्षीस वितरण”

दिनांक ०३/०१/२०२४ रोजी पोलीस बहुउद्देशीय सभागृह लॉनमध्ये पोलीस “रेझीग सप्ताह” निमीत्त आयोजित विविध सांघिक स्पर्धा २०२४ PLAY With POLICE यानिमित्ताने चैतन्य पोलीस ग्राऊंड व पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय भंडारा येथे कबड्डी, किकेट, फुटबॉल, व्हॉलीबाल, हॉकी, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो अशा विवीध प्रकारचे सांघिक खेळांचे आयोजन केले होते. आजपर्यत चालु असणा-या जिकलेल्या वेगवेगळया खेळ खेळाडूना प्रथम, व्दितीय, तृतीया पारीतोषीक रोखरक्कम व पारीतोषीक देवुन मा. श्री. लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा व श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक भंडारा, श्री. शुध्दोधन आंबेगावे कर्मशिला शहापुर यांचे उपस्थितीत गौरव करण्यात आला.

मा. श्री. लोहित मतानी पोलीस अधीक्षक भंडारा यानी मार्गदर्शनपर पोलीस वर्धापन दिवसा निमीत्त व उपस्थित खेळाडु ज्यानी खेळात भाग घेतला व जे विनर झाले त्याना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस दलातर्फे दिनांक ०२/०१/२०२४ ते ०८/०१/२०२४ पर्यंत रेझींग डे निमीत्त विविध किडा स्पर्धाचे तसेच पोलीस बहुउद्देशीय पोलीस मुख्यालय भंडारा येथे पोलीस कार्यसंबधीत माहिती जनतेला जाणीव व्हावी. याकरीता पोलीस सायबर सेल भंडारा, पोलीस बॉम्ब शोधक भंडारा, पोलीस बॅन्ड पथक, पोलीस वेपन याबाबत स्टॉल लावण्यात आले आहे.

यावेळी श्री. नितीन चिचोंळकर स्थागुशा भंडारा, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अभिजीत पाटील ठाणेदार वरठी, श्री. सुबोध वंजारी सायबर सेल भंडारा, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रघुनाथ चौधरी, राखीव पोलीस उपनिरीक्षक प्रधान, पोलीस बॅन्ड पथक पोलीस बॉम्ब शोधक पथक, पोलीस सायबर विभागातील, पोलीस कवायत निर्देशक येथील अंमलदार व शाळकरी खेळाडू पोलीस खेळाडू उपस्थित होते.