कामगार दिनाच्या औचित्याने होत असलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये 1 मे रोजी…

कामगार दिनाच्या औचित्याने होत असलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये 1 मे रोजी

राज्यकर निरीक्षक पदाचे नियुक्तीपत्र गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांचे हस्ते देण्यात येणार

गडचिरोली,दि.27: महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा 63 वा वर्धापन दिन समारंभ दिनांक 1 मे 2023 रोजी संपूर्ण राज्यभरामध्ये साजरा होत आहे. सदर दिवशी कामगार दिनाच्या औचित्याने राज्यभरात ठिकठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन महाराष्ट्र राज्य शासनामार्फत करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या वस्तू व सेवाकर विभागात राज्यकर निरीक्षक या संवर्गातील एकूण 697 पदाच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब या संयुक्त परीक्षेअंतर्गत घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेअंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त झालेल्या 361 उमेदवारांना दिनांक 1 मे 2023 रोजी होणाऱ्या राज्यभरातील रोजगार मेळाव्यामध्ये राज्यकर निरीक्षक या पदाचे नियुक्तीपत्र संबंधीत जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्य हस्ते देण्यात येणार आहे.

वस्तू व सेवाकर विभाग, नागपूर या अंतर्गत येणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या व राज्यकर निरीक्षक या पदाच्या नियुक्तीसाठी शिफारस प्राप्त झालेल्या 2 उमेदवारांना उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा, देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यकर निरीक्षक पदाचे नियुक्तीपत्र 1 मे 2023 रोजी कामगार दिनाच्या औचित्याने होत असलेल्या रोजगार मेळाव्यामध्ये देण्यात येणार आहे. असे सहायक राज्यकर आयुक्त, वस्तु व सेवा कर कार्यालय, गडचिरोली यांनी कळविले आहे.