अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या मार्फत 

अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या मार्फत 

राबविण्यात येत असलेल्या योजनाबाबत समुपदेशन सत्राचे आयोजन

गडचिरोली, दि.04: राज्यातील आर्थिक दृष्टया दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ सुरू करून त्यामार्फत स्वयंरोजगार इच्छुक उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती, मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येते त्यासाठी लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ कशापध्दतीने घ्यावे याबाबत जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक.06.07.2022 रोजी वेळ दूपारी 01.00 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.2,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्या योजनेबददल समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर सत्रांकरीता अण्णासाहेब पाटील, आर्थिक मागास विकास महामंडळचे, जिल्हा समन्वयक श्रीमती अमरीन पठाण, प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभणार असून सदर समुपदेशन सत्राला स्वयंरोजगार करण्यास इच्छूक असलेल्या सर्व उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्रमांक-2 युनिट क्र.2,कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे व्यक्तिश: सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे, अधिकारी / कर्मचारी यांनी केली आहे. असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे.