22 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

22 फेब्रुवारी रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

            चंद्रपूर, दि. 21: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडल करिअर सेंटर आणि  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने, 22 फेब्रुवारी 2024 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जुने डिएड/बिएड कॉलेज, आनंदवन चौक, वरोरा येथे सकाळी 11 वाजता सदर रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून 10वी, 12वी, आय.टी.आय., पदविका, पदवी आदी बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील नामांकित उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या दृष्टीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.  या रोजगार मेळाव्यात 850 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून विविध नामांकित कंपन्या सहभागी होत आहे. या माध्यमातून चंद्रपूर, पुणे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

या आहेत मेळाव्यात सहभागी नामांकित कंपन्या:

स्पंदना स्फुर्ती फायनन्स प्रा.लिमिटेड, चंद्रपूर, जय महाराष्ट्र प्लेसमेंट सर्विसेस, भारत पे प्रा.लिमि., विदर्भ क्लिक 1 सोल्यूशन, एल.आय.सी ऑफ इंडीया, नवभारत फर्टिलायझर औरंगाबाद, आणि टॅलेनसेतू प्रा. लि. पुणे आदी कंपन्या सहभागी होणार असून सदर कंपन्यामध्ये विविध पदे असल्याचे उद्योजकांकडून कळविण्यात आले आहे.

नोंदणी व आवश्यक कागदपत्रे:

उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे झेरॉक्स प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोंदणी करुन ऑनलाईन अ‍ॅप्लाय करावे.

सदर मेळाव्याचे उद्घाटन सहायक जिल्हाधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते होणार आहे. या मेळाव्याचे वैशिष्टय म्हणजे सदर मेळावा नि:शुल्क असून उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 दुरध्वनी क्रमाकांवर संपर्क साधावा. जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.