15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता

चंद्रपूर, दि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.