चंद्रपूर मनपात स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

चंद्रपूर मनपात स्व. राजीव गांधी पुण्यतिथीनिमित्त दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन

देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने २१ मे रोजी देशभरात दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात येतो. या निमित्ताने चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात कार्यक्रम पार पडला.

भारतात दरवर्षी २१ मे रोजी दहशतवाद विरोधी दिन साजरा केला जातो. राष्ट्रीय एकात्मता वाढवणे, दहशतवाद कमी करणे आणि सर्व जाती, पंथ इत्यादी लोकांमध्ये एकता वाढवणे या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.  २१ मे १९९१ रोजी भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या केली होती. या निमित्ताने २१ मे रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन पाळण्यात आला. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांना दहशतवाद विरोधी दिवसाची शपथ दिली.