पशुपालकांनी जनावारांना लसीकरण करुन घ्यावे  / लाळया खुरकत रोगाला लसीकरणाने प्रतिबंध करा पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

पशुपालकांनी जनावारांना लसीकरण करुन घ्यावे 

लाळया खुरकत रोगाला लसीकरणाने प्रतिबंध करा

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

          भंडारा,दि.2 : जिल्ह्यात पशुधन मोठया प्रमाणावर असुन लाळया खुरकत रोगाला प्रतिबंध करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने  जनावरांना लसीकरण करून घेण्याचे आवाहन केले आहे.

सध्या थंडीचे प्रमाण असून थंडीच्या दिवसांमध्ये जनावरांना लाळ्या खुरकत या संसर्गजन्य रोगाची लागण होण्याची शक्यता  असते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून भंडारा पशुसंवर्धन विभागाकडून जनावरांना लसीकरण केले जात आहे.

         जिल्हयातील पशुसंवर्धन विभागाकडुन लसीकरण मोहीम  या जानेवारी महिन्यापासुन 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. ज्या  पशुंच्या कानाला अदयाप बिल्ला नसेल त्यांनी बिल्ले लाऊन घ्यावे  व लस टोचून घ्यावी,अश्या  पशूची नोंद National Digital Livestoock Mission ह्या पोर्टल वर घेण्यात येत असते.त्यामुळे जनावरांचा झालेल्या लसीकरणाची माहिती online केंद्र शासनास सादर होत असते.

           लाळ खुरकतीची लक्षणे

या आजाराची  लागण झाली की जनावरांमध्ये पुढील लक्षणे दिसुन येतात.जसे की जनावरांला ताप येतो, गायी –म्हशी नियमितपणे चारा खात नाही, जनावर पाणी पिणे बंद करते, जर  दुभते जनावर असेल तर दुधाचे प्रमाणही कमी होते. या दरम्यानच्या काळात जनावराच्या तोंडाच्या आतील भागाला तसेच जीभेवर फोड येतात. जनावरांच्या तोंडातून लाळ गळते जनावरांच्या पायात जखमा होतात.व जनावराची उत्पादन क्षमता कमी होते.

        लहान वासराना हा रोग झाल्यास त्यांचा मृत्यु होऊ शकतो.ह्या रोगात  जनावरांचे मृत्यु होण्याचे प्रमाण फारच कमी असले तरी जनावरांची उत्पादनक्षमता कमी होते.त्यामुळे आर्थिक नुकसान अधिक होते.तसेच संकरीत जनावरांमध्ये हा रोग झाल्यास जनावरांना दुरुस्त झाल्यानंतरही धाप लागते.

       तरी या आजारावर लसीकरण हाच प्रतिबंधात्मक उपाय आहे,याची जाणीव पशुपालकांनी ठेवावी व संपूर्ण गाय-म्हैस वर्गीय पशुंचे लसीकरण करून घ्यावे,असे आवाहन पशुसंवर्धन विभागानी  केले आहे.