छत्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

त्रपती शिवाजी महाराज सारथी जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेसाठी अर्ज आमंत्रित

         भंडारा, दि. : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी मार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज सारथी’ जिल्हास्तरीय वसतिगृह संकुल योजनेंतर्गत खाजगी नोंदणीकृत संस्थांकडून महाविद्यालयातील मुला मुलींसाठी वसतिगृह चालविण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

            संस्था निवडीचे पात्रता निकष अटी शर्ती या सारथी संस्थेच्या http://sarthimaharashtragov.in या संकेतस्थळवर उपलब्ध आहे. अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून  वर्धा जिल्ह्याकरिता 6 जानेवारी  2024 तर नागपूर,चंद्रपूर, गडचिरोली व भंडारा जिल्ह्याकरिता 8 जानेवारी 2024 तर गोंदिया जिल्ह्याकरिता 11 जानेवारी 2024 अशी आहे.  उपव्यवस्थापकीय संचालक, सारथी नागपूर (शहर), विभागीय कार्यालय (सारथी) नागपूर, वनामती, नागपूर परिसर येथील इमारत (शरद व ग्रीष्म) व्ही.आय.पी.रोड, धरमपेठ, नागपूर येथे पाठवावी.

            अर्ज करणारी इच्छुक संस्था ही मुंबई विश्वस्त कायदा, 1950 किंवा संस्था नोंदणी कायदा 1860 अंतर्गत नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. संस्थेचे 3 वर्षाचे लेखापरीक्षण पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सुसज्ज वसतिगृह असलेल्या खाजगी नोंदणीकृत संस्थांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल, अशी माहिती सारथी संस्थेने  पत्रकाव्दारे दिली आहे.