जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 7 जानेवारी पर्यंत नोंदणीची मुदत

जागतिक कौशल्य स्पर्धेसाठी 7 जानेवारी पर्यंत नोंदणीची मुदत

चंद्रपूर, दि.28: कौशल्य विकास उपक्रमांचा लाभ शहरी व ग्रामीण भागाच्या तळागाळातील घटकांपर्यंत पोहचावा व युवकांना त्यांचे कौशल्य जागतिक स्तरावर दाखविण्याची संधी मिळावी, यासाठी जागतिक कौशल्य स्पर्धा-2024 आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी http://kaushalya.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर 7 जानेवारी 2024 पर्यंत नोंदणीची मुदत आहे.

बांधकाम व इमारत तंत्रज्ञान, ट्रान्सपोर्टेशन व लॉजिस्टिक, मॅन्युफॅक्चरिंग व इंजिनिअरिंग टेक्नोलॉजी, इन्फॉर्मेशन व कम्युनिकेशन टेक्नोलॉजी, क्रीएटिव्ह आर्टस ॲन्ड फॅशन, सोशल व पर्सनल सर्व्हिस या क्षेत्रातील कौशल्यधारकांनी नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.