गडचिरोली : शिवसेना महिला आघाडी अहेरी विधानसभा उपजिल्हा संघटिका सौ. पौर्णिमाताई ईष्ठाम यांची भामरागड तालुक्याला सदिच्छा भेट.

शिवसेना महिला आघाडी अहेरी विधानसभा उपजिल्हा संघटिका सौ. पौर्णिमाताई ईष्ठाम यांची भामरागड तालुक्याला सदिच्छा भेट.

सदाशिव माकडे(गडचिरोली जिल्हा)

भामरागड : आज दिनांक ०६ आगष्ट रोजी भामरागड तालुक्यात सदिच्छा भेट देण्यात आली. तालुका मुख्यालयापासून नगरपंचायत परिक्षेत्रात पदयात्रा काढण्यात आली व गोरगरीब जनतेच्या समस्या जाणून घेतल्या व त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. पक्षाच्या नवीन सदस्य नोंदणीचे कार्यक्रम हाती घेऊन मा. ना. उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्ष प्रमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आणि मा. कीर्तिकर विदर्भ संपर्क नेते, मा. एकनाथजी शिंदे पालकमंत्री गडचिरोली, प्रकाशजी वाघ पूर्व विदर्भ समन्वयक, किशोर पोतदार गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख, विलास कोडापे सहसंपर्क प्रमुख यांच्या मार्गदर्शनात रियाजभाई शेख विधानसभा अहेरी जिल्हा प्रमुख, अरुणभाऊ धुर्वे उपजिल्हा प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना व महिला यांना पक्ष प्रवेश करून शिवबंधन बांधत सौ. पौर्णिमाताई ईष्ठाम उपजिल्हा संघटिका, बिरजूभाऊ गेडाम अहेरी विधानसभा संघटक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्ष प्रवेश करून घेतले. भामरागड नगरपंचायत परिसरातील १७ प्रभागात पदयात्रांच्या माध्यमातून घरोघरी भेटी देऊन जनतेचे विविध प्रश्न समजून घेत ते मार्गी लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा करून सोडविण्यात येईल असे आश्वासन बिरजूभाऊ गेडाम व सौ पौर्णिमाताई ईष्ठाम यांनी दिले. पदयात्रेच्या माध्यमाने जनसंपर्क अभियान सातत्याने घेण्यात येईल असेही शिवसेनेचे पदाधिकारी यांनी आपले मत व्यक्त करतांना बोलले. याप्रसंगी शिवसेनेचे महिला आघाडी इंदूताई गायकवाड, गुड्डू ईष्ठाम, विमल आत्राम, निर्मला सडमेक, विक्की सिडाम, मनिष ईष्ठाम, लालसू धुर्वा, गुरूदास मसराम, प्रेमीला निलेश्वर, तस्लीम शेख, जयश्री बाला, राधिका हलदर, विशाल धुर्वा. सौं. ठाकरेताई आदी प्रामुख्याने उपस्थित होते.