यवतमाळ नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनात गैर प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करा

यवतमाळ नगरपरिषद घनकचरा व्यवस्थापनात गैर प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यास निलंबित करा

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

नागपूर,12 :-यवतमाळ नगरपरिषदेत घनकचरा व्यवस्थापनासाठी गैर पद्धतीने डी. एम. एन्टरप्रायजेस कंपनीस पात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करावे, अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, बारा कोटीची निविदा होती. चौकशी झाल्यावर कारवाई करू असे सांगण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल विभागीय आयुक्तांनी दिला आहे. तरी देखील अशा गैर प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्याला सेवेत ठेवणे उचित नाही. अधिकाऱ्याने भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याचे निलंबन करणार का?असा प्रश्न श्री. वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. सरकारकडून यासंदर्भात 15 दिवसात कारवाई करू असे उत्तर देण्यात आले.