भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 1 जानेवारी पासून त्रृटी पूर्तता शिबिराचे आयोजन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

1 जानेवारी पासून त्रृटी पूर्तता शिबिराचे आयोजन

            भंडारा दि. 18 :अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना स्वाधार योजना अर्ज छाननी करून भोजन, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वत: उपलब्ध करण्यासाठी त्याचा एक भाग म्हणून सहायक आयुक्त, समाज कल्याण भंडारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना विद्यार्थी लाभार्थ्यांचे शिबीर 1 जानेवारी 2024 पासून आयोजित करण्यात येत आहे.

स्वाधार योजनेंतर्गत या कार्यालयातील दाखल अर्ज जलद गतीने निपटारा करण्यासाठी या कार्यालयातील सहायक लेखाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीमार्फत स्वाधार योजनेंतर्गत अर्ज तपासणी व त्रृटी पुर्तता करण्यासाठी शिबीराचे आयोजन करून त्यात जिल्ह्यातील व्यवसाययिक, बिगरव्यवसायिक व इतर महाविद्यालयातील विद्यार्थी यांचे स्वाधार योजनेचे अर्ज पात्र ठरविण्याकरिता व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी त्यांना संधी देवून निपटारा करण्याकरिता शिबीर आयोजन केलेले आहे.

या शिबीरात विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून अर्जातील त्रृटीची पुर्तता करावी, असे आवाहन सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी केले आहे.