निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात प्राणी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी

निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात प्राणी मृत्यूप्रकरणी दोषींवर कारवाई करावी

विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

नागपूर,12 :-पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत संभाजीनगर, चिंचवड येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात नूतनीकरण व सुशोभिकरणासाठी 2015 साली आराखडा मंजूर करण्यात आला. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हे प्राणी संग्रहालय बंद आहे. प्राण्यांचे मृत्यू झाले आहेत. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयात 2017 ते 2023 या कालावधीत 36 प्राणी मृत्युमुखी पडले. प्राण्यांची काळजी न घेतल्याने हे मृत्यू झाले आहेत. ही बाब गंभीर असून दोषींवर कारवाई केली पाहिजे. या मृत्यूप्रकरणी संबंधित अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी श्री. वडेट्टीवार यांनी केली. सरकारकडून समाधानकारक उत्तर देण्यात आले.