चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी-खैरी गोंडपिपरी रस्त्यांचा दर्जा सुधारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी-खैरी गोंडपिपरी रस्त्यांचा दर्जा सुधारा

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

मुंबई दि 11:- चंद्रपूर-बल्लारपूर-बामणी-खैरी गोंडपिपरी रस्त्यांच्या कामाचा दर्जा सुधारावा. या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांचा जीव दगावला आहे. ठेकेदाराचा या रस्त्यांच्या कामात हलगर्जीपणा असून त्याच्यावर सरकार का कारवाई करत नाही, असा सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. त्याचबरोबर या ठिकाणच्या रस्त्यांची आवश्यकता तेथे पुनर्बांधणी करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

आज विधानसभेत प्रशोत्तराच्या तासात श्री. वडेट्टीवार बोलत होते.

श्री. वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील आक्सापुर- चिंतलधाबा रस्ता खराब झाला आहे. चार वर्षापासून लोक हैराण झाले आहेत. अकरा लोकांचा जीव गेला आहे. या रस्त्याची लेन अतिवृष्टीमुळे खराब झाली आहे. या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. या ठिकाणी सिमेंट रस्ते करावे लागतील. कंत्राटदार काम करत नाही. सरकार कंत्राटदार चौकशी करणार का? कंत्राटदारावर कारवाई करणार का? त्याला काळ्या यादीत टाकणार का? असा सवाल देखील केला. सरकारकडून या प्रश्नाला सकारात्मक उत्तर मिळाले.
बारा महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण होईल, या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.