21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

21 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन

चंद्रपूर दि. 18 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत शिक्षक पात्रता परीक्षा (महाटिईटी) दि.21 नोव्हेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 15 परीक्षा केंद्रावर पेपर-1 सकाळी 10.30  ते 1 या कालावधीत तर 14 परीक्षा केंद्रावर पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 या कालावधीत निश्चित केलेल्या केंद्रावर घेण्यात येणार आहे.

तरी, सर्व परीक्षार्थींनी आपल्या प्रवेश पत्रात नमूद परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिट अगोदर उपस्थित राहावे. परीक्षा केंद्रात पेपर सुरू होण्यापूर्वी 20 मिनिट अगोदर प्रवेश देण्यात येईल. प्रवेश केंद्राचे अंतर लक्षात घेऊन परीक्षार्थींनी प्रवासाचे नियोजन करावे. आपल्या प्रवेश पत्रातील सूचना काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे कार्यवाही करण्याची नोंद घ्यावी. असे शिक्षणाधिकारी (प्राथ.)  दिपेंद्र लोखंडे यांनी कळविले आहे.

हि आहेत परीक्षा केंद्रे:

महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-1 साठी केंद्र क्र.7501- सरदार पटेल महाविद्यालय,चंद्रपूर, 7502- न्यू इंग्लिश हायस्कूल,7503, लोकमान्य टिळक विद्यालय, 7504- लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर,7505- रफी अहमद किद्वाई हायस्‍कूल, 7510- जुबली जिल्हा परिषद हायस्कूल, 7511- एफ.ई.एस गर्ल्स हायस्कूल, 7512-हिंदी सिटी हायर सेकंडरी स्कूल, 7513-छोटुभाई पटेल हायस्कूल, 7514-नेहरू विद्यालय चंद्रपुर,7515 सेंट मायकल इंग्लिश स्कूल, 7516-जनता विद्यालय चंद्रपूर,7517-भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, 7518- डॉ.आंबेडकर कॉलेज, चंद्रपूर तर 7519 माउंट कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल, चंद्रपूर यांचा समावेश आहे.

शिक्षक पात्रता परीक्षा पेपर-2 साठी केंद्र क्र. 7506-सेंट मायकल सीबीएससी इंग्लिश स्कूल चंद्रपूर, 7507- मातोश्री माध्यमिक विद्यालय तुकुम, 7508-न्यू इंडिया कॉन्व्हेंट हायस्कूल, 7509-विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, 7510-जुबली जिल्हा परिषद हायस्कूल, 7511-एफ.ई.एस.गर्ल्स हायस्कूल, 7512-हिंदी सिटी हायर सेकंडरी स्कूल, 7513-छोटुभाई पटेल हायस्कूल, 7514-नेहरू विद्यालय,चंद्रपूर, 7515-सेंट मायकल इंग्लिश स्कूल,7516-जनता विद्यालय चंद्रपूर, 7517-भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, 7518- डॉ.आंबेडकर कॉलेज चंद्रपूर तर 7519-माउंट कारमेल कॉन्व्हेंट हायस्कूल,चंद्रपूर यांचा समावेश आहे.