निवृत्तीधारकांसाठी पेंशनर्स समाधान ॲप

निवृत्तीधारकांसाठी पेंशनर्स समाधान ॲप

भंडारा दि. 11 :निवृत्तीवेतनविषयक तक्रारीच्या समाधानाकरीता तसेच निवृत्तीवेतनविषयी अडचण, शंका सोडविण्यासाठी महालेखापाल कार्यालय, नागपूरमार्फत पेंशनर्स समाधान ॲप, पेंशन तुमच्या दारी  हे ॲप तयार करण्यात आले आहे.

पेंशन तुमच्या दारी या अंतर्गत निवृत्तीवेतनसंदर्भात काही तक्रारी, शंका, प्रश्न असल्यास  या ॲपव्दारे सोडविता येतील. त्यात निवृत्तीवेतनधारकांच्या शंकाचे समाधान करण्याकरीता व्हॉटसअप व झुम व्हिडीओ कॉल, वेबसाईट टोल फ्री नंबर, ई-मेल, तसेच संपर्काकरीता दुरध्वनी क्रमांक देण्यात आले आहे. पत्रव्यवहाराकरीता ई-मेल तसेच दस्ताऐवज जमा करण्याकरीता हेल्प डेस्क देण्यात आले आहे. तरी भंडारा जिल्हयातील सर्व निवृत्तीवेतनधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. टोल फ्री क्रमांक 18002337834 किंवा 0712-2992250 व ईतर दुरध्वनी क्रमांक 0712-2561378, 2555592, 2549007 दस्ताऐवज पाठविण्याकरीता pensionhelp.mh2.ae@cag.gov.in  या मेलवर संपर्क करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, मंगला डोरले यांनी कळवले आहे.