माजी सैनिकांना सुचना

माजी सैनिकांना सुचना

भंडारा दि. 4: जिल्हयातील आजी सैनिक/माजी सैनिक/विधवांना कळविण्यात येते की, जिल्हयात महसूल सप्ताह कार्यक्रम दि.१/८/२०२३ पासून ते ७/८/२०२३ पर्यंत साजरा करण्यात येत असून दिनांक ५ ऑगष्ट २०२३ रोजी सैनिकांकरिता कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

आजी सैनिक/ माजी सैनिक/विधवांच्या काही अडीअडचणी असल्यास कींवा संबधित कार्यालयाकडून दाखले/प्रमाणपत्र मिळण्याकरीता अडचणी असल्यास त्यांनी आपला लेखी स्वरुपात अर्ज आपल्या तालुक्यात संबधित कार्यालयास सादर करावे व अर्जाची एक प्रत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दयावी. या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.