विकृती कुष्ठरुणावर मोफत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 

विकृती कुष्ठरुणावर मोफत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन 

            भंडारा,दि. 22 : जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 21 व 23 फेब्रुवारी,2024 या कालावधीत पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.कुष्ठरोगाचे लवकर निदान व उपचार न झाल्यामुळे हाताची, पायाची किंवा डोळयांची विकृती येऊ शकते.विकृतीमुळे लोकांमध्ये भीती निर्माण होते पण विकृती झाल्यास शस्त्रक्रीया केल्याने विकृती बरी होते. या संधीचा लाभ विकृती असलेल्या रुग्णांनी घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी मिलींद सोमकुवर यांनी केले आहे.

          श्स पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिश्स करण्याकरीता केंद्र शासनामार्फत सर्जन डॉ. कृष्णमुर्ती कांबळे यांची टीम, क्षेत्रीय कुष्ठ प्रशिक्षण तथा अनुसंधान संस्थान रायपूर,छत्तीसगढ व जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथील तज्ञ डॉक्टर हे कुष्ठरोगामुळे आलेल्या विकृती रुग्णावर शस्त्रक्रिया करणार आहेत.तसेच शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना शासनाकडून बुडीत मजुरी म्हणून 8 हजार रुपये मानधन स्वरुपात मिळणार आहे. तरी  या रूग्णसुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग भंडारा यांनी केले आहे.