सन 2019 व 2021 मधील महाभरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षा शुल्क परत करण्याची लिंक सुरु

सन 2019 व 2021 मधील महाभरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षा शुल्क परत करण्याची लिंक सुरु

भंडारा,दि. 07 : माहे मार्च 2019 व माहे ऑगस्ट 2021 (अपंग व इतर सुधारीत आरक्षणासह) महाभरती अंतर्गत ग्रामविकास विभागाच्या अखत्यारीतील जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील 18 संवर्गाची सर्व जाहिरात, परीक्षा व संपूर्ण भरती प्रक्रिया रद्‌द करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांनी अर्जापोटी भरलेले परीक्षा शुल्क त्यांना जिल्हा परिषदांमार्फत परत करावयाचे आहे.

            सन 2019 व 2021 मधील महाभरती अंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षा शुल्क परत करण्याच्या अनुषंगाने https://maharddzp.com या संकेतस्थळावर उमेदवारांसाठी दिनांक 5/9/2023 पासुन लिंक सुरु करण्यात आली आहे.

            सदर लिंकद्वारे जिल्हा परिषद भंडाराकडे माहे नोव्हेंबर, 2023 अखेर पर्यंत एकूण 3249 उमेदवारांनी परीक्षा शुल्क परत करण्याकरीता अर्ज केले असुन त्यापैकी बँक खाते क्रमांक व आयएफएससी कोड Verified 2850 उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्काची रक्कम रु.8,83,750/- RTGS प्रणालीद्वारे त्यांचे बँक खात्यात जमा करण्यात आले आहे.

            तसेच ज्या उमेदवारांनी सन 2019 व माहे ऑगस्ट 2021 महाभरती अंतर्गत परीक्षा शुल्क भरणा केले आहे, त्यांनी सदर परीक्षा शुल्काची रक्कम परत मिळणेबाबत https://maharddzp.com या संकेतस्थळावर अर्ज सादर करावे. जेणेकरुन जिल्हा परिषद भंडाराकडून संबंधितांचे परीक्षा शुल्काची रक्कम परत करण्यात येईल.