शासकीय वसतिगृहाकरीता इमारत भाड्याने घेण्याकरीता प्रस्ताव आमंत्रित   

शासकीय वसतिगृहाकरीता इमारत भाड्याने घेण्याकरीता प्रस्ताव आमंत्रित                                                                   

     -समाज कल्याण विभागाला प्रस्ताव द्यावे

 

भंडारा, दि.2 मे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण, भंडारा यांच्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह या वसतिगृहाकरीता शंभर विद्यार्थी क्षमतेची व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह या वस्तीगृहाकरीत 75 विद्यार्थी क्षमतेची तसेच कार्यालय, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, भांडारगृह, ग्रंथालय कक्ष, स्वच्छतागृहे, क्रिंडागण इत्यादी बाबींची किमान पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या भंडारा नगरपरिषद क्षेत्र किंवा तीन किमी लगतच्या परिसरामधील इच्छुक इमारत मालकाकडून इमारत भाड्याने देण्याकरीता प्रस्ताव मागविण्यात आले आहे.

 

इमारत भाडे सार्वजनिक बांधकाम विभाग, भंडारा यांच्या भाडे निश्चीतच्या अधीन राहील. तर संपुर्ण माहिती व प्रस्तावाचा नमुना सहायक आयुक्त समाज कल्याण, भंडारा कार्यालयात सादर करावेत, असे सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख यांनी कळवले आहे.