आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या प्रशिक्षण सत्राचे उदघाटन

आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परिक्षेच्या प्रशिक्षण सत्राचे उदघाटन

चंद्रपूर,दि.05:  आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रात या वर्षातील तिसरे सत्र दि. 1 डिसेंबर 2023 पासून सुरु झाले आहे. या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जठारे यांच्या हस्ते करण्यात आले.

 यावेळी, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे, कनिष्ठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी श्री. गराटे, कर्मचारी संजय राठोड व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

 उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) अतुल जठारे उपस्थित प्रशिक्षणार्थी विद्यार्थी-विद्यार्थीनींना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, आपल्या समोर निश्चित ध्येय ठेवा व आपल्या पात्रतेनुसार यश मिळविण्यासाठी प्रयत्न करा. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. व श्री. जठारे यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार केला.