इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या पंचायत समिती मार्फत अर्ज सादर करावी

इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी आपल्या पंचायत समिती मार्फत अर्ज सादर करावी

         भंडारा,दि.01 : प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,अंतर्गत शबरी आदिवासी घरकुल योजना ग्रामीण क्षेत्र सन 2023-24 करिता 1226 इतका लक्षांक प्राप्त आहे.सदर योजने करीता इच्छुक आदिवासी पात्र लाभार्थ्यांनी परीपुर्ण भरलेले अर्ज आपल्या पंचायत समिती मार्फत सादर करावे,

        तसेच अर्जासोबत खालील प्रमाणे कागदपत्रे जोडण्यात यावी,

  1. अर्जदाराचे नजीकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो,
  2. लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा,
  3. रहिवासी दाखला,

4.7/12,सातबारा उतारा किंवा नमुना-8-अ तसेच घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही यासाठी

  1. उत्पन्नाचा दाखला तहसिलदार यांचा
  2. एक रद्द केलेला धनादेश/राष्ट्रीयकृत बॅकेचे पासबुक प्रथम पानाची सत्यप्रत,
  3. ग्रामसभेचा ठराव
  4. शिधा पत्रिका
  5. आधार कार्ड
  6. सदर योजनेचा लाभ यापुर्वी आदिवासी विकास विभाग,अथवा इतर कोणत्याही शासकीय विभागाकडून घेतला

      नसल्याबाबत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

  1. सयुक्त कुटुंब असल्यास कुटुंबीयातील सदस्यांना यापुर्वी घरकुल लाभ न मिळाल्याचा प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह परीपुर्ण भरलेले अर्ज संबंधित पंचायत समितीस दिनांक 6 डिसेबर,2023 रोजी पर्यत तात्काळ सादर करावे,व योजनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागाचे निरज एस.मारे यांनी कळविले आहे.