30 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित

30 नोव्हेंबर रोजी रोजगार मेळावा आयोजित

भंडारा, दि.29: जिल्हयातील सुशिक्षित बेराजगार युवक व युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी              सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा / ऑफलाईन प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.

 रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित कंपन्या सहभागी होणार असून त्यांच्या माध्यमातून एकूण 40 रिक्तपदे भरण्यात येणार असून जिल्हायातील नोकरीइच्छुक सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

मेळाव्यामध्ये मुलाखत व तत्सम प्रक्रीयेद्वारा उमेदवारांची निवड होणार असल्याने उमेदवारांनी स्वखर्चाने मेळाव्याच्या दिवशी व वेळेत शैक्षणिक कागदपत्राच्या छायांकित प्रती व पासपोर्ट फोटोसह उपस्थित राहावे. नोकरीइच्छुक युवक व युवतींनी सदर रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अप्लाय करावा. महास्वयंम पोर्टलवर ऑनलाईन अर्ज होत नसल्यास https://forms.gle/aM3o2Ukn1gTzaXJt6 लिंक ओपन करून गुगलफॉर्म भरुन अर्ज करावा किंवा क्यू आर कोड स्कॅन करून गुगल फॉर्मद्वारे ऑनलाईन अर्ज करावा.

सदर मेळाव्याचा जिल्हयातील अधिकाधीक नोकरीइच्छुक व गरजू युवक व युवतींनी या सुवर्णसंधीचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,सुधाकर झळके यांनी केले आहे. याबाबत काही अडचण / शंका असल्यास कार्यालयाच्या  07184-252 250 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा श्री.श.क.सय्यद मो.क्र.7620378924 यांचेशी संपर्क साधावा.