आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023. मिशन इन्द्रधनुष 5.0 मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनी

आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023. मिशन इन्द्रधनुष 5.0 मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनी

माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूरचा उपक्रम

नागपूर, दि. 21 – “राष्ट्रीय पोषण माह” निमित माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपुर, जिल्हा प्रशासन, भंडारा आणि एस. टी. महामंडळ, भंडारा यांच्या सहयोगाने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023, मिशन इन्द्रधनुष 5.0 विषयां वर आधारीत मल्टीमिडीया छायाचित्र प्रदर्शनी एस.टी. बस स्टैंड, भंडारा येथे आयोजित करण्यात येत आहे. सदर प्रदर्शनी दिनांक 25 से 27 सप्टेंम्बर, 2023 पर्यंत सकाळी 9 ते संध्याकाळी 7 बाजे पर्यंत सर्वांसाठी निःशुल्क खुली राहणार आहे.

प्रदर्शनीचे उद्घाटन 25 सप्टेंबर, 2023 रोजी सकाळी 10:00 वाजता भंडा-याचे खासदार मा. श्री. सुनील मेंढे यांच्या हस्ते संपन्न होणार असून प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभाग नियंत्रक, एस. टी. महामंडळ भंडारा हे लाभणार आहेत, अशी माहिती केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी श्री सौरभ खेकडे यांच्या वतिने कळविण्यात आले आहे.