जनावरांच्या ‘लम्पी स्किन’ रोगाचे वेळीच उपाययोजना करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

जनावरांच्या ‘लम्पी स्किन’ रोगाचे वेळीच उपाययोजना करण्याचे कृषि विज्ञान केंद्राचे आवाहन

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात जनावरांवर येणारे लम्पी स्कीन डिसीज चे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. शेतकरी पशुपालकांनी मुळीच घाबरून न जाता लम्पी स्कीन रोगाचे सकारात्मक निदान करण्याकरीता नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली व्दारे करण्यात येत आहे.

लम्पी स्कीन रोग हा त्वचा रोग असून हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना

होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. हा आजार माणसांवर होत नाही. हा विषाणू मेंढ्यामध्ये होणाऱ्या देवीच्या

विषाणूशी साधर्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरीत जनावरे या विषाणूला लवकर बळी

पडतात. हा आजार साधारणपणे दोन-तीन आठवड्यात बरा होणारा आजार असून लम्पी स्कीन आजारापासून

जनावरांचे बचाव होण्यासाठी पुढील प्रमाणे काळजी घ्यावी असे आवाहन कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली

व्दारे करण्यात येत आहे.

जनावरांसाठी घातक लम्पी त्वचा रोग

लम्पी स्किन (त्वचा) रोग असून विषाणूमुळे होणारा साथीच आजार आहे. याचा प्रादुर्भाव सर्व वयोगटातील गाई- म्हशीमध्ये आढळतो व तो मोठ्या प्रमाणात पसरतो. गाई मध्ये याचे प्रमाण म्हशी पेक्षा जास्त दिसते. प्रौढ जनावरापेक्षा लहान वासरामध्ये याचे प्रमाण जास्त असते. शेळ्या-मेंढ्यामध्ये हा आजार आढळत नाही. या रागामुळे मरतुकीचे प्रमाण कमी आहे परंतू जनावर अशक्त होते. जनावराची त्वचा कायम स्वरूपी डागाळलेली खराब होते व बाजारमुल्य कमी होते. दूध उत्पादन घटते व बैलांच्या कार्य क्षमतेवर परिणाम होतो.

लम्पी स्किन आजार सन १९२९ ते १९७८ पर्यंत दक्षिण व पूर्व आफ्रिकेमध्ये दिसून येत होता. सन २००० मध्ये तो मध्य-पूर्वेतील देश, त्यानंतर २०१३ मध्ये तुर्की येथे आढळला. अलीकडेच तो रशिया, चायना, बांग्लादेश व आता भारतात पसरताना दिसत आहे. भारतात या रोगाची नोंद ओरिसा राज्यात ऑगष्ट २०१९ रोजी झाली महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सदरील रोगाचे शास्त्रशुध्द पध्दतीने व्यवस्थापन आणि लसीकरण राबविणे क्रमप्राप्त झाले आहे. रोग लक्षणे

‎‫܀‬‎ बाधित जनावरे २ ते ४ आठवडे बाह्य लक्षणे दाखत नाहीत.

जनावरास तीव्र स्वरूपाचा ताप (१०४ ते १०५° फॅरनहाईट) येतो. डोळ्यातून व नाकातून स्त्राव वाहतो. भूक-तहान कमी होते.

‎‫܀‬‎ डोळे, मान पाय, छाती, पाठ, मायांग व कासेवर १० ते ३० मि.मी. व्यासाच्या गाठी येतात, तोंडात, नाकात व डोळ्यात व्रण उठतात.

तोंडातील व्रणामुळे जनावरास चारा खाण्यास व रवंथ करण्यास त्रास होतो.

अंगावरील गाठी पुटून जखमा होतात.

डोळ्यातील व्रणामुळे चिपडे येऊन पापण्या एकमेकांना चिकटून दृष्टी बाधित होते…

दूध उत्पादन कमी होईल किंवा पूर्णपणे बंद होईल.

गाभण जनावरे बाधित झाल्यास गाभडण्याची शक्यता असते.

फुफ्फसाच्या दाहामुळे व श्वसनास अडथळा होऊन मृत्यू होऊ शकतो.

पायावर सूज येते. जनावरे लंगडतात.

लम्पी त्वचा रोगाचा प्रसार

या रोगाचा प्रसार डास, गोचिड, माशा, किटक, चिलटे यांच्या माफत होतो.

निरोगी जनावर बाधित जनावराच्या संपर्कात आल्याने याचा प्रादुर्भाव होतो. बाधित जनावरांच्या अश्रु, नाकातील स्त्राव व विर्यामध्ये रोगाचे विषाणू आढळून येतात हे विषाणू

पाणी – चाऱ्यामध्ये मिसळल्याने सुध्दा प्रसार होतो.

बाधित जनावरांचा चारा-पाणी दुषित होऊन इतर निरोगी जनावरांमध्ये याचा प्रसार होतो. बाधित जनावरांच्या संपर्कात आलेल्या व्यतिच्या अंगावरून, कपड्यावरून याचा प्रसार इतर निरोगी

जनावरांना होऊ शकतो.

उष्ण व दमट हवामानात किटकांची वाढ झपाट्याने होते व या काळात रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.

बाधित नराच्या विर्यामुळे मादीला व नवजात वासरांना संक्रमण होऊ शकतो. दूध पिणाऱ्या वासरास बाधित गाईच्या दुधातून कासेवरील जखमामुळे लागण होऊ शकते..

उपाय योजना

‎‫܀‬‎ गोठा नेहमी हवेशीर व स्वच्छ ठेवावा. जेणेकरून किटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही.

गोव्यात डास माश्यांच्या नियंत्रणासाठी निरगुडी, सुकेशेण व कडुलिंब पाला याचा धूर करावा. कापूर, करंजतेल, कडूलिंबाचे तेल, १ टक्के फॉर्मलिन, २ ते ३ टक्के सोडिम हायपोक्लोराईड किंवा

२ टक्के फिनाईलची फवारणी करावी.

जनावरांच्या अंगावार निंब तेल, करंज तेल लावल्यास डास, माशी चावत नाहीत.

गोचिड नियंत्रणासाठी औषध फवारणी करावी किंवा १ मिली प्रती ५० किलो जनावराचे वनज प्रमाणे

आयव्हर मेक्टीन इंजेक्शन कातडीखाली द्यावे.

बाधित / निरोगी जनावरांना एकत्र चारा पाणी अथवा चरायला सोडू नये. आजारी व निरोगी जनावरे

संपर्कत येऊ देऊ नये.

बाधित जनावरे निरोगी जनावरांपासून किमान एक महिना वेगळी ठेवावीत.

चराऊ कुरणावर जनावरे एकत्रित चरावयास सोडू नये. सार्वजनिक ठिकाणी पाणी पाजू नये.

बाहेरील / बाजारातील जनावरे गावात अथवा गोव्यात आणू नयेत.

लसीकरण व उपचार

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावे. लसीकरण चार महिने व त्यावरील वयाच्या सर्व

गाई-म्हैस वर्गीय जनावरांना करावे. कमी तीव्रतेची लम्पी स्कीन रोगाची लस शेळी-मेंढीची देवी रोगाची लस पशुवैद्यकाकडून करून घ्यावी.

आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरास तात्काळ पशुतज्ञाकडून उपचार करून घ्यावेत.

ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनाशमक औषध टोचून द्यावे. जीवणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा.

प्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी उपचार करावेत.

जनावरांच्या शरीरावर झालेल्या जखमा २ टक्के पोटॅशिअम परमँगनेटच्या पाण्याने धुऊन त्यावर

बोरोग्लिसरीन लावावे.

लम्पी रोगाबाबत मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती करण्याचे कार्य कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली मार्फत सुरू असून या रोगामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी रोग होऊ नये म्हणून काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

जनावरांच्या आरोग्याची काळजी घ्या ।

नियमित तपासणी पशुवैद्यकाकडून करून घ्या ।