9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

9 व 10 डिसेंबर रोजी नागपूर येथे नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.22: कौशल्य विकास, रोजगार व नावीन्यता विभागाअंतर्गत नागपूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय राज्यस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  सदर मेळाव्याचे आयोजन दि. 9 व 10 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जमनालाल बजाज, प्रशासकीय भवन, नागपूर विद्यापीठ, नागपूर येथे करण्यात आले आहे.

सदर मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, कौशल्य विकास रोजगार व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रसाद लोढा आदींची उपस्थिती असणार आहे. तसेच  या मेळाव्यामध्ये 200 आस्थापनांचे स्टॉल असणार आहेत. जिल्ह्यातील उद्योजकांनी     https://Rojgar.mahaswayam.gov.in या विभागाच्या पोर्टलवर जागा अपलोड कराव्यात.

उमेदवारांनी मेळाव्याकरीता येताना आधार कार्ड, शैक्षणिक अहर्ताच्या प्रमाणपत्रासह उपस्थित रहावे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या मेळाव्यामध्ये जास्तीत-जास्त बेरोजगार उमेदवारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.