चंद्रपूर येथील अट्टलगुन्हेगारासस्थानिकगुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

चंद्रपूर येथील अट्टलगुन्हेगारासस्थानिकगुन्हे शाखेने ठोकल्या बेड्याः-

थोडक्यात हकीकतः-

पोलीस स्टेशन लाखनी येथील सोनम विस्तारी हलमारे यांचे घरी 29/01/2023 रोजी मागील दाराचा कडी कोंढा तोडुन चोरट्यांनी घरफोडी केल्याने पोलीस स्टेशन लाखनी येथे अप. क्र. 25/23 कलम 454,380 भा. दं. वि. चा गुन्हा दाखल करण्यात आला.

स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा च्या पथकातील API नारायण तुरकुंडे, HC सतिश देशमुख, PN शैलेश बेदुरकर, बंडी मडावी, योगेश पेठे, सुनील ठवकर, आशीष तिवाडे, PC कौशीक गजभिये यांनी घटनास्थळाची पाहणी केली व गोपनीय बातमीदारांना कार्यान्वीत केले. HC सतिश देशमुख स्थानिक गुन्हे शाखा भंडारा यांच्या गोपनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीवरुन घरफोडी करणारा चंद्रपूर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार सुमोहित ऊर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम, वय 25 वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, बायपास रोड, चंद्रपूर, जि. चंद्रपूर. याने केल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली. दिनांक 27/07/2023 रोजी मिळालेल्या माहिती वरुन सापळा रचुन सुमोहित ऊर्फ गोलु चंद्रशेखर मेश्राम, वय 25 वर्ष, रा. अष्टभुजा वार्ड, बायपास रोड, चंद्रपूर, जि. चंद्रपूर याला ताब्यात घेतले. आरोपीस विश्वासात घेऊन चौकशी केली तेव्हा त्यांनी लाखनी येथील घरफोडी त्याचा साथीदार आरोपी नामे नागेश्वर विलास खोब्रागडे, वय अंदाजे 24 वर्ष, रा. राजेगाव, ता. लाखनी याच्या मदतीने केल्याचे कबुल केले. आरोपी सुमोहित मेश्राम याची अधिक चौकशी केली असता त्याने (2) पोलीस स्टेशन लाखनी अप. क्र. 148/2022 कलम 379 भा. दं. वि, (3) पोलीस स्टेशन लाखनी अप. क्र. 235/2022 कलम 379 भा. दं. वि, (5) पोलीस स्टेशन अड्याळ अप. क्र. 22/2023 कलम 379 भा. दं. वि, (8) पोलीस स्टेशन कारधा अप. क्र. 176/2022 कलम 379 भा. दं. वि, (9) पोलीस स्टेशन भंडारा अप. क्र. 586/2022 कलम 379 भा. दं. वि. (10) पोलीस स्टेशन भंडारा अप. क्र. 31/2023 कलम 379 भा. दं. वि. ठिकाणी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.

156/2022 कलम 379 भा. दं. वि, (4) पोलीस स्टेशन लाखनी अप. क्र.

179/2022 कलम 379 भा. दं. वि, (6) पोलीस स्टेशन कारधा अप. क्र. 236/2022 कलम 379 भा. दं. वि, (7) पोलीस स्टेशन कारधा अप. क्र.

मा. पोलीस अधीक्षक श्री. लोहित मतानी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडेयांच्या मार्गदर्शनात वरील सर्व नमुद पोलीस अधिकारी व अमलदारांनी अथक परिश्रम व कौशल्यपुर्ण तपास करुन आरोपीस जेरबंद करुन पोलीस स्टेशन लाखनी च्या ताब्यात पुढील कारवाई करीता देण्यात आले.