सिव्हिल लाईन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक  

सिव्हिल लाईन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास १ लक्ष रुपयांचे प्रथम पारितोषिक  
गणेशोत्सव सजावट/ देखावे व सौंदर्यीकरण पंधरवाडा स्पर्धेचे विजेते घोषित

चंद्रपूर २१ नोव्हेंबर  – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित पर्यावरण पुरक सार्वजनिक गणेश मंडळ व सौंदर्यीकरण लीग स्पर्धेत सिव्हिल लाईन येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम क्रमांक प्राप्त झाला असुन या मंडळास १ लक्ष रुपयांचे रोख बक्षीस तसेच ट्रॉफी व सन्मानपत्र लवकरच आयोजित होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहे.
गणेशोत्सवाच्या पर्वावर मनपा स्वच्छता विभागातर्फे सदर स्पर्धा ही २ टप्यात आयोजित करण्यात आली होती.  सजावट/ देखावे स्पर्धा १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर या कालावधीत तर सौंदर्यीकरण पंधरवाडा स्पर्धा ०२ ऑक्टोबर ते १७ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घेण्यात आली होती.यात ४२ मंडळांनी भाग घेतला व १८ मंडळांनी सक्रिय सहभाग दर्शविला होता.
त्रयस्थ परीक्षकांद्वारे दिल्या गेलेल्या गुणांकनानुसार सजावट/ देखावे स्पर्धेत चौकात पर्यावरण पूरक मूर्ती व सजावट,ध्वनिप्रदूषण रहित वातावरण,आवश्यक सर्व शासकीय परवानग्या घेणे,सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धा,निर्माल्यपासुन खत निर्मिती,परिसराची स्वच्छता व शिस्त राखणे,सामाजीक संदेश देणारे देखावा तयार करणे इत्यादीवर ४० टक्के गुणांकन देण्यात आले.
तर सौंदर्यीकरण पंधरवाडा स्पर्धेत परिसरात उपलब्ध भिंतीवर / जागेवर पेंटिंग करणे,माझी वसुंधरा चा लोगो व पंचतत्व लोगो लावणे / पेंटिंग करणे,वृक्षारोपण,टाकाऊ पासुन टीकाऊ वस्तु बनविणे,किल्ला स्वच्छता करणे,लोकसहभागातुन सौंदर्यीकरण / बेंचेस / ट्री गार्ड / शिल्प / कारंजे उभारणे,दुकानांमध्ये डस्टबिनचा वापर करणे इत्यादींवर ६० टक्के गुणांकन दिले देण्यात आले.
यात ७१ हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक न्यू इंडिया युवक गणेश मंडळ यांना, ५१ हजार रुपयांचे तृतीय पारितोषिक नवयुवक बाल गणेश मंडळ दत्तनगर यांना तर हिवरपुरी बाल गणेश मंडळ,जोडदेऊळ पठाणपुरा गणेश मंडळ,ओम गणेश मंडळ,सार्वजनिक गणेश मंडळ व जयहिंद गणेश मंडळ यांना प्रत्येकी २१ हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.